राष्ट्रीय

‘झाकीर नाईक हिरो’, असे शिकवण्यात येत आहे शाळे मधे

शिकवण अलीगडमधील इस्लामिक मिशन स्कूलमध्ये दिली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Zakir Naik, झाकीर नाईकअलीगड – वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू व इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) संस्थेचा संस्थापक झाकीर नाईक हिरो असल्याची शिकवण अलीगडमधील इस्लामिक मिशन स्कूलमध्ये दिली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रकरण समोर आल्यानंतर आता शाळा प्रशासन झाकीर नाईकचा विषय अभ्यासक्रमातून काढणार असल्याचं सांगत आहे. शिक्षण विभागाचे अधिकारीदेखील प्रकरणाचा योग्य तपास करुन आवश्यक ती कारवाई करणार असल्याचं बोलत आहेत.
शाळा व्यवस्थापक शोहिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हे पुस्तक दोन वर्षांपूर्वी छापण्यात आलं होतं. त्यावेळी झाकीर नाईकवर कोणताही आरोप नव्हता. नव्या आवृत्तीत झाकीर नाईकचा उल्लेख काढून टाकण्यात आला आहे’. जिल्हा शिक्षण अधिकारी धिरेंद्र सिंह यांनी सांगितलं की, ‘प्रकरण समोर आलं आहे, चौकशी केल्यानंतर कारवाई करण्यात येईल. सोबतच आपलं पुस्तक छापण्यासाठी शाळेकडे परवानगी होती की नव्हती याचीही चौकशी केली जाणार आहे’.
शाळेची माजी विद्यार्थिनी डेनिशने 2017 मध्ये आपल्याला शाळेत वादग्रस्त झाकीर नाईकसंबंधी शिकवण्यात आलं होतं अशी माहिती दिली आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: