सिनेमा

Review : ‘टायगर जिंदा है’

tiger

‘टायगर जिंदा है’बद्दल एका ओळीत सांगायचे झाल्यास अॅक्शन पॅक आणि देशभक्तीवर आधारीत ही फिल्म आहे. फिल्मची कथा सुरु होते 40 नर्सेसना वाचवण्याच्या मिशननने. या मिशनवर असतो टायगर (सलमान खान) आणि जोया (कतरीना कैफ). या 40 नर्सेसमध्ये 25 भारतीय आणि 15 पाकिस्तानी नर्स असतात. या नर्सेसना इराकमध्ये आयएसआयने किडनॅप केलेले असते. अमेरिका इराकवर बॉम्ब वर्षाव करण्याच्या तयारीत असते. त्यांनी भारताला नर्सेसना सोडवण्यासाठी 7 दिवसांचा अवधी दिलेला असतो. या 7 दिवसांत जर भारताने नर्सेसना सोडवले नाही तर अमेरिका बॉम्ब वर्षाव करणार असते. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या नर्सेस अडकलेल्या असल्याने दोन्ही देश संयुक्त कारवाई करतात. या कामासाठी भारताकडून टायगरची निवड होते. तर पाकिस्तानमधून जोया असते.
– अॅक्शन आणि ड्रामाने भरपुर असलेल्या या सिनेमात टायगर आणि जोया आयएसआयच्या अड्ड्यापर्यंत पोहोचतात का, ते नर्सेसना सोडवण्यात यशस्वी होतात की स्वतः अडकतात या प्रश्नांची उत्तरे पडद्यावर पाहायला मिळेल.
– या मिशनमध्ये टायगर आणि जोयाला कोणकोणत्या संकटांचा सामना करावा लागतो, ते त्याला कसे तोंड देतात हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन फिल्म पाहावी लागेल.

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

Movie Review

User Rating: 3.55 ( 1 votes)
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: