मुंबई

11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .

माणकोली परिसरात गोदामांना भीषण आग लागली आहे. ही आग एकामोगामोग एक अशा तब्बल 11 गोदामांना लागली.

mankoli-bhiwandi-fire-

 

भिवंडी – भिवंडीतील ओवळी परिसरातील 11 गोदामांना भीषण आग लागली आहे. ही सर्व गोदामे प्लास्टिक, कच्च्या मालाची असल्याची माहिती मिळत आहे.  भिवंडीतील ओवळी ग्रामपंचायत हद्दीतील ही घटना आहे. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गोदामांना ही भीषण आग लागली. सागर कॉम्लेक्स येथील बी-1 मधील 11 गोदामांना आग लागली आहे.  आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे, कल्याण व भिवंडी मनपाचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत.  दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे अाग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: