Uncategorized

पुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू

पुणे- शिवाजीनगर भागातील दळवी हॉस्पिटलसमोरील गोदाम व त्याला लागून असलेल्या प्रिंटींग प्रेसला मध्यरात्री लागलेल्या आगीत 2 कामगारांचा मुत्यू झाला. लक्ष्मण राम सुतार (वय 33 ) आणि नरपतसिंग राजपूत ( वय 33) अशी त्यांची नावे आहेत.
हिमालय हाईट या इमारतीतील गाळे आहेत. मिठाईसाठी लागणाऱ्या बॉक्स बनविण्याचे काम तेथे चालते. त्याच्या अंतर्गत आतील बाजूला प्रिंटींग प्रेस आहे. मध्यरात्री 3 च्या सुमारास या बंद गाळ्याला आग लागली. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या व एक टँकर यांनी ही आग विझविण्यास सुरुवात केली, बंद गेल्याचे शटर जेसीबीने तोडले व आग विझविण्यास सुरवात केली तेंव्हा आतील बाजूला 2 कामगार अडकल्याची माहिती मिळाली. तिकडे अग्निशमन च्या जवानांनी सर्व पाण्याचा मारा करून जळालेल्या अवस्थेत 2 ना बाहेर काढले. पण त्याचा मुत्यू झाला.
आगीवर एक तासात नियंत्रण मिळविण्यात आले. सुमारे 4 तास हे काम सुरू होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
प्रेस मध्ये झोपलेले दोन्ही कामगार हे फर्निचर चे काम करत होते. व सध्या निगडीला रहात असून काल प्रेसमध्ये झोपले असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: