मनोरंजन

अनुष्का-विराटच्या लग्नाची बातमी,कुटुंबासह इटलीला रवाना.

भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार आणि बॉलीवू़ड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे लग्न होणारे असल्याचे वृत्त आले होते.

VIRAT

अनुष्का आणि विराट कोहलीच्या लग्नाच्या चर्चांना पुन्हा एकदा ऊत आला आहे. दोन दिवसांपूर्वी अनुष्का आणि विराट इटलीत 9, 10, 11 दरम्यान लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण नंतर अनुष्काच्या प्रवक्त्यांनी ही बातमी खरी नसून अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र गुरुवारी रात्री उशीरा अनुष्का आणि विराट इटलीला रवाना झाले असल्याची माहिती मिळाली आहे. अनुष्का मुंबईहून तर विराट दिल्लीहून रवाना झाले आहेत. त्यांच्याबरोबर कुटुंबासह जवळचे मित्र होते अशीही माहिती मिळाली आहे.

विशेष म्हणजे अनुष्का आणि तिच्या कुटंबाबरोबर त्यांचे आध्यात्मिक गुरू महाराज अनंत बाबा हेही असल्याची माहिती मिळाली आहे. त्यात लग्नाच्या बातम्या खऱ्या असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. 12 डिसेंबरला रात्री दोघे लग्न करणार असून 9 तारखेपासून लग्नाचे विधी सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

विराटने घेतली आहे श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सिरीजमधून विश्रांती, अनुष्काचीही सुट्टी

10 डिसेंबरपासून होणाऱ्या श्रीलंकाविरुद्धच्या एक दिवसीय सिरीजमध्ये विराट सहभाग घेणार नाही. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे 15 जणांच्या तिसऱ्या टेस्ट टीममध्ये देखील विराट नाही. त्याच्या जागी रोहित शर्मा टीमला लीड करणार आहे. एवढेच नव्हे, तर अनुष्का शर्मा देखील सुट्टीवर जात आहे. विराटने श्रीलंकाविरुद्ध टेस्ट सुरू होण्यापूर्वीच आपल्या सुट्टीचा अर्ज दिला होता. पण विराटचे सुट्टीचे कारण समोर आले नव्हते.

बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन्हीही गोष्टी भारतीयांसाठी जीव की प्राण आहे. क्रिकेट आणि सिनेमाचा रोमांसही काही नवीन नाही. आज अनेक क्रिकेटर असे आहेत ज्यांनी बॉलिवूड अॅक्ट्रेससोबत लग्न केले आहे. मात्र यामध्ये सर्वात पहिले नाव येते ते अभिनेत्री शर्मिला टागोर आणि मंसूर अली खान पतोडी यांचे. आज बॉलिवूड अॅक्ट्रेस शर्मिला टागोर यांचा बर्थडे आहे. शर्मिला टागोर यांचे मन जिंकण्यासाठी इंडियन क्रिकेट टीमचे तेव्हाचे कॅप्टन नवाब पतोडी यांना एक नाही, दोन नाही तर चार वर्षे लागली होती.

 • चार वर्षांनंतर शर्मिलांनी दिला होकार… 
  – शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतोडी अर्थात टायगर पतोडी यांची पहिली भेट 1965 मध्ये दिल्लीत झाली होती. पहिल्या भेटीतच इंडियन क्रिकेट टीमचे कॅप्टन ज्यूनियर पतोडी क्लिन बोल्ड झाले होते. पतोडी तेव्हा जगातील सर्वात तरुण कॅप्टन होते.
  – शर्मिला त्यांच्या फिल्मच्या शूटिंगसाठी दिल्लीत होत्या. तेव्हा दोघांच्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची भेट झाली होती. दोघेही मोठे नाव असलेल्या कुटुंबातील होते. पतोडी नवाबांच्या परिवारातील होते तर शर्मिला या रविंद्रनाथ टागोरांच्या फॅमिलीतील.
  – टायगर पतोडी यांना लव्ह अॅट फर्स्ट साइट झाले असले तरी शर्मिला यांचे मन जिंकणे तवेढे सोपे नव्हते. त्यासाठी त्यांना 4 वर्षे लागली. क्रिकेटर असलेले पतोडी नवाबांच्या परिवाराचे एकमेव वारस असले तरी बंगली नायिकेच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी हे पुरेसे नव्हते.
 • दिले होते फ्रिज गिफ्ट
  – नवाब पतोडींनी शर्मिला टागोर यांना इम्प्रेस करण्यासाठी फ्रिज गिफ्ट केले होते. आजच्या काळात फ्रिज सर्वसामान्य झाले असले तरी त्यावेळी ही फार महागडी चैनेची वस्तू आणि किचनमधील शान मानली जात होती. मात्र त्यांचे हे महागडे गिफ्टही उपयोगी पडले नाही.
  – पतोडी यांना शर्मिला टागोर यांचे मन जिंकण्यासाठी फार पापड लाटावे लागले होते. त्यानंतर शर्मिला यांनी होकार दिला होता.
 • षट्कार ठोकून होत होते ग्राऊंडमध्ये स्वागत
  – शर्मिला आणि नवाब पतोडी यांच्या प्रेमाचे किस्से आजही अनेक क्रिकेटर्स सांगत असतात. शर्मिला जेव्हा क्रिकेट मॅच पाहाण्यासाठी जात होत्या, तेव्हा टायगर पतोडी त्यांचे स्वागत षट्कार ठोकून करत होते, असे म्हटले जाते.
  – काही वर्षे डेट केल्यानंतर जेव्हा दोघांनी लग्नाचा विचार केला तेव्हा दोघांच्याही कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हते.
  – शर्मिला यांच्या आई-वडिलांना आपली मुलगी एका नवाबाच्या घरातील सून व्हावी हे आवडणारे नव्हते, तर पतोडी फॅमिलीला चित्रपटांमध्ये काम करणारी तरुणी सून म्हणून नको होती.
  – दोघांच्या प्रेमाच्या ताकदीपुढे त्यांच्या कुटुंबियांचा विरोध फार काळ टिकला नाही आणि अखेर दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या लग्नाला हिरवा कंदिल दाखवला.
  – लग्नाच्या आधी शर्मिला यांनी धर्मपरिवर्तन केले आणि शर्मिला टागोरच्या त्या आयशा सुल्ताना झाल्या होत्या.
 • 42 वर्षांची जोडी 2011ला फुटली
  – 27 डिसेंबर 1969 ला शर्मिला आणि पतोडी यांचा निकाह झाला.
  – शर्मिला आणि पतोडी यांना एक मुलगा (सैफ अली खान) आणि दोन मुली सबा आणि सोहा अली आहे.
  – बॉलिवूड आणि क्रिकेटचा हा संसार तब्बल 42 वर्षे चालला. 22 डिसेंबर 2011 ला पतोडी यांचे निधन झाले आणि ही जोडी फुटली. वास्तविक दोघेही आपापल्या क्षेत्रात यशस्वी असलेल्या या जोडीचे वैवाहिक आयुष्यही यशस्वी राहिले.
तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: