क्रिकेट

विराट-अनुष्काचा विवाह झाला .

काल ११ नोव्हेंबरला अनुष्का व विराट यांनी लग्नगाठ बांधली. काल रात्री ९ वाजता विरूष्काने लग्नाची अधिकृत घोषणा केली.

virat-anushka-1

 बॉलिवूडची चुलबुली गर्ल अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार विराट कोहली इटलीमध्ये विवाहबंधणात अडकले आहेत.

विरुष्काच्या शाहीविवाह सोहळ्याचा विधी सुरु झाला असून १५ डिसेंबर पर्यंत हा लग्नसोहळा रंगणार आहे. विराट आणि अनुष्काचा विवाह हा पंजाबी पंद्धतीने झाला. विराट आणि अनुष्का दोन्ही ही पंजाबी आहेत.

इटलीमध्ये सोमावारी दुपारी विराट आणि अनुष्का यांनी सात फेरे घेतले. लग्न सोहळ्यामध्ये दोन्ही कुटुंबियांच्या जवळचे व्यक्ती आणि मित्र परिवार उपस्थित होते. या सोहळ्यासाठी सचिन आणि युवराज व्यतिरिक्त अजून कोणालाही आमंत्रण दिलं गेलं नव्हतं.

लग्नानंतर क्रिकेटर्स आणि बॉलिवूडकरांसाठी मुंबईतील जेडब्लू मॅरियट हॉटेलमध्ये २६ डिसेंबरला मोठं रिसेप्शन दिलं जाणार आहे. ज्यामध्ये अनेक मोठ्या व्यक्ती सहभागी होणार आहेत. दोघांच्या नातेवाईकांसाठी २१ डिसेंबरला दिल्लीत रिसेप्शन ठेवण्यात आलं आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: