महाराष्ट्र

दोन बसची समोरासमोर भीषण धडक,ड्रायव्हर ठार, 30 जखमी.

अंबाजोगाई येथून जवळच असलेल्या वरवटी गावाजवळ आज सकाळी 8 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

bus-accident

अंबाजोगाई- दोन एसटी बसची समोरासमोर भीषण धडक होवून झालेल्या अपघातात बस चालकाचा मृत्यू झाला तर 30 पेक्षाही अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमीमध्ये महिला आणि बालकांचा समावेश आहे. वरवटी गावाजवळ आज (गुरुवार) सकाळी 8 वाजता हा अपघात झाला.

गंगाखेड-पुणे आणि लातूर-परभणी या दोन बसची समोरासमोर धडक झाली. दोन्ही बसच्या कॅबीनचा चक्नाचूर झाल्या आहेत. लातूर- परभणी बसचे चालक मारूती गोपीनाथराव कातकडे (वय-40) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर सर्व जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: