महाराष्ट्र

श्रीरामपूरजवळ गाड्या एकमेकांवर आदळल्या,अपघातात ५ जण ठार.

बेलापूर-श्रीरामपूर रोडवर आज पहाटे हा भीषण अपघात झाला.

car शिर्डीमध्ये तीन गाड्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

बेलापूर-श्रीरामपूर रोडवर आज पहाटे हा भीषण अपघात झाला. स्विफ्ट कार, दुधाचा टँकर आणि इंडिका कार एकमेकांवर धडकली. मात्र यामध्ये स्विफ्ट गाडीतील पाच जणांचा मृत्यू झाला.

मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आटोपून श्रीरामपूरला परतणाऱ्या तरुणांच्या कारला बेलापूर खुर्दजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील सहापैकी पाच तरूण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. बेलापूर ते श्रीरामपूर रस्त्यावर मध्यरात्री हा अपघात झाला.

नितीन सोनवणे (वय २७), शिवा ढोकचौळे (वय २७, दोघेही रा. रांजणखोल, ता. राहाता), सचिन तुपे (वय २८), भारत मापारी (वय २७, दोघेही रा. भैरवनाथनगर, ता. श्रीरामपूर), सुभाष शिंदे (वय ३०, ब्राम्हणगाव वेताळ, श्रीरामपूर) अशी या मृत तरुणांची नावे आहेत. तर या अपघातात पियूष पांडे हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. हे सर्व जण एका कारमधून (एमएच १७, एसी ९००९) देवळाली प्रवरा येथे मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेले होते. तेथून परत येत असताना त्यांच्या कारच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ती उलटली आणि समोरून येणाऱ्या अन्य वाहनांशी तिची धडक झाली. याचवेळी आणखी एक भरधाव वेगाने येणारी कार या कारवर आदळली. स्विफ्ट कार, दुधाचा टँकर आणि इंडिका कार एकमेकांवर धडकली. त्यामुळे स्विफ्ट गाडीतील पाच जणांचा मृत्यू झाला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा नोंदविला असून अधिक तपास करत आहेत. धुक्यामुळे अपघात झाला काय यादृष्टीनेही पोलीस तपास सुरु आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: