नागपुर

हिवाळी अधिवेशनाच्या पोलीस अर्धवट जेवण.

हिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अर्धवट जेवण .

Nagpur-Police

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अर्धवट जेवण दिल्याची बातमी झी मीडियाने दाखवल्यावर अर्धवट जेवण देणाऱ्या कॅटरर्सवर कारवाई करीत पोलीस विभागाने श्रीकृष्ण केटरर्सची सेवा तात्काळ बंद केली आहे.

श्रीकृष्ण केटरर्स असे या केटरर्सचे नाव आहे. नागपुरात हिवाळी अधिवेशनास सोमवार पासून सुरवात झाली आहे. अधिवेशनाच्या सुरक्षेकरिता सुमारे ५ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात आली आहे. विविध पॉईंट्स वर या कर्मचाऱयांना तैनात करण्यात आले आहे.

याच पॉईंट्स वर पोलिसांना जेवण उपलब्ध करून देण्याची सोय पोलीस विभागाने केली आहे. याकरिता १० रुपयात चपाती,  दोन भाज्या, वरण, भात, सलाद, लोणचे, पापड व एक स्वीट देण्यात येणार होते. मात्र काही पॉईंट्सवर पोलिसांना केवळ वरण-भातावरच समाधान मानावे लागले.

याबाबतचे वृत्त झी मीडियाने प्रसारित केल्यावर पोलीस प्रशासनाने जेवण पुरविणाऱ्या संबंधित श्रीकृष्ण केटरर्सची सेवा बंद करण्यात आल्याची माहिती दिली. शिवाय नागपूर पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी व पोलीस कल्याण विभाग पोलीस कर्मचाऱ्यांच्या भोजन, निवास व इतर व्यवस्थेवर सतत लक्ष ठेऊन आहेत व कोणालाही असुविधा होणार नाही याची काळजी घेत असल्याचे पोलीस खात्याकडून सांगण्यात आले आहे.

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: