मुंबई

सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन पाच दिवस बंद राहणार

मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन पाच दिवस बंद राहणार आहे.

Siddhivinayak-Ganapati-Mumbai

मुंबईकरांचं श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचं दर्शन पाच दिवस बंद राहणार आहे. माघी गणेशोत्सवानिमित्त मूर्तीला शेंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे दर्शन सुविधा बंद करण्यात येणार असल्याची माहिती सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनं दिली आहे.

माघी गणेशोत्सवाला रविवारपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरातील गणेशमूर्तीला शेंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे १० ते १४ जानेवारीपर्यंत दर्शन बंद राहणार आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत भाविकांना गणेशाच्या प्रतिमूर्तीचे दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली. सोमवारी, १५ जानेवारीपासून पूजन आणि आरती झाल्यानंतर दुपारी एक वाजता भाविकांना गाभाऱ्यातून दर्शन घेता येईल, असंही त्यांनी सांगितलं.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: