पुणे

पुरुषाची डोक्यात दगडानं ठेचून हत्या , रस्त्यावर फेकला मृतदेह.

खराबवाडी गावाच्या हद्दीत सारा सिटीमागील एमआयडीसी रस्त्यावर फोक्सवॅगन कंपनीच्या प्लॉटसमोर एका 30 ते 35 वयाच्या पुरुषाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे.

chakan

पुणे- चाकण औद्योगिक वसाहतीत खराबवाडी (ता. खेड) हद्दीत सारा सिटीपासून मर्सिडीज बेंज कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. युवकाचा डोक्यात दगड घालून त्यांची हत्यात करण्‍यात आली आहे. त्याचे वय 30 ते 35 असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. ही धक्कादायक घटना आज (मंगळवार) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, चाकण परिसरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित युवकाची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. पुणे ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला या बाबतची माहिती सकाळी कामावर जाणाऱ्या काही कामगारांनी दिली होती. त्यानंतर नियंत्रण कक्षाने चाकण पोलिसांना सूचित केले होते. त्यानंतर घटनास्थळी चाकण पोलीस दाखल झाले आहेत.

पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी चाकण ग्रामीण रुगणालयात हलविण्यात आला आहे. हा मृतदेह जवळपासच्या भागातील युवकाचा असल्याची शक्यता गृहीत धरून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी सारा सिटीच्या पाठीमागील सारासिटी ते मर्सिडीज बेंझ रस्त्यावर याच भागात एका महिलेचाही खून झाला होता.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: