राष्ट्रीय

चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीताची सक्ती नाही,सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सिनेमा सुरू होण्याआधी आता राष्ट्रगीताची सक्ती नसेल. सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य नसेल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

national-anthem

नवी दिल्ली : सिनेमा सुरू होण्याआधी आता राष्ट्रगीताची सक्ती नसेल. सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य नसेल असा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने आपलाच निर्णय बदलला आहे. 2016 साली या संदर्भातील निकाल आल्यानंतर या निर्णयाला पाठिंबा देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेचा अनेकांनी विरोध केला होता. त्यानंतर चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवणे अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारने आपली भूमिका बदलली होती . त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने चित्रपटगृहात राष्ट्रगीत अनिवार्य करण्याच्या निर्णयाला स्थगिती देऊन निकालामध्ये बदल करावा, अशी विनंती केंद्र सरकारने  सोमवारी सर्वोच्च न्यायालायाला केली होती. त्यावर निर्णय देताना आज सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात बदल केला.  सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

यापूर्वी संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी  एका समितीचे गठण करण्यात आले असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच शपथपत्र सादर करून सांगितले होते. जोपर्यंत मंत्र्यांच्या समितीची निर्णय येत नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात अंतरिम बदस करावा, अशी विनंतीही केंद्र सरकारने केली होती.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: