राष्ट्रीय

तात्काळ तिकीटांचा घोटाळा यासाठी मिळत नाही तत्काल तिकिट .

सॉफ्टवेअरच्या मार्फतच अजय गर्ग प्रत्येक तिकीटाची माहिती ठेवायचा आणि त्यानुसार आपलं कमिशन घ्यायचा.

rail_jpg

नवी दिल्ली : ट्रेनची तात्काळ तिकीटं मिळवण्यात येणाऱ्या अडचणींमागे मोठा घोटाळा असल्याचं उघड झालं आहे. सॉफ्टवेअरच्या साहाय्याने हा घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे हे सॉफ्टवेअर सीबीआयच्याच एका असिस्टंट प्रोग्रॅमरने तयार केलं आहे. सीबीआयने अजय गर्ग नावाच्या प्रोग्रॅमरला अटक केली आहे.

सॉफ्टवेअरमुळे तत्काल तिकिटाच्या एकत्र बुकिंगमुळे अवघ्या काही मिनिटांत तिकिट संपल्याचं समोर येत असे. हे सॉफ्टवेअर सीबीआयच्या असिस्टंट प्रोग्रामर अजय गर्गने तयार केलं होतं. सीबीआयने या प्रोग्रामरला अटक केली असून तत्काल तिकिटाचा मोठा घोटाळा यामुळे समोर आला आहे. हे आहे खरं कारण ज्यामुळे तत्काल तिकिट अवघ्या काही मिनिटांत संपत असे.

सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय गर्गने बनवलेल्या या सॉफ्टवेअरला बुकिंग एजंटपर्यंत जौनपुरचा अनिल कुमार गु्प्ता घेऊन जात असे. एजंटना अजय गर्गबद्दल कोणतीही माहिती नाही. एकदा सॉफ्टवेअर मिळाल्यानंतर बुकिंग एजंट एकावेळा हजारो तिकिट तत्काल बुक करू शकतात. आणि याचमुळे सामान्यांना अधिक किंमत तिकिटासाठी मोजावी लागते. तत्काल तिकिटापासून मिळणारा अतिरिक्त पैशाचा एक भाग अनिल गुप्ताकडे जातो. आणि मग त्यानंतर तो त्यातील काही भाग अजय गर्ग या प्रोग्रामरला देत असे.

या घोटाळ्यात सॉफ्टवेअरच्या मार्फत अजय गर्ग एकेका तिकिटाची माहिती ठेवत असे. आणि त्यानुसार त्याला तसे कमिशन मिळत असे. या घोटाळ्यातून मिळणारा पैसा अजय गर्ग बिटक्वाइनमध्ये गुंतवत असे. तर कधी कॅश लागल्यासस तो एजंटकडे अधिक पैसे मागत असे. अनिल गुप्ता जेव्हाही दिल्लीत येत असे तेव्हा तो अजय गर्गला कॅश देऊन जात असे.  

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार अजय गर्ग हा खेळ गेल्या वर्षापासून सुरू होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, यूपीएससीच्या मार्फत सीबीआयमध्ये येण्या अगोदर अजय गर्ग आय़आरसीटीसीचा प्रोग्रामर होता. आयआरसीटीसीमध्ये 2007 ते 2011 दरम्यान नोकरी करताना त्याने या वेबसाइटमधील त्रुटी ओळखल्या आणि नवीन सॉफ्टवेअर बनवून त्याने हा घोटाळा केला आहे.

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: