राष्ट्रीय

आधार कार्ड लिंक करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवणार.

सुप्रीम कोर्टातील आधार अनिवार्यतेच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने हे स्पष्ट करण्यात आलं.

Adhar

केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना, बँक अकाऊंट आणि मोबाईल नंबरशी आधार लिंक करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टातील आधार अनिवार्यतेच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने हे स्पष्ट करण्यात आलं.

केंद्र सरकारच्या वतीने शुक्रवारी आधार लिंकिंगची डेडलाईन वाढवण्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि बँक खात्याशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2017 होती. तर मोबाईल नंबर रिव्हेरिफाय करण्यासाठी 6 फेब्रुवारी 2018 पर्यंत वेळ देण्यात आला होता.

केंद्र सरकारने सर्व कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य केलं आहे. याविरोधात सुप्रीम कोर्टात विविध याचिका दाखल झाल्या आहेत. याबाबत पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे.

”आधार कार्डच्या अनिवार्यतेवर आता बंदी आणता येणार नाही. कारण ही प्रक्रिया पुढे गेली असून अनेक वर्ष उलटले आहेत. केंद्र सरकार या मुद्द्यावर चर्चेसाठी तयार आहे”, अशी माहिती सुप्रीम कोर्टात अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: