पुणे

लग्नाच्या काही तास आधीच तरूणीची गळफास आत्महत्या .

लग्नाच्या अवघ्या काही तासांपूर्वी नवरी मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरीत (मंगळवार) रात्री घडली.

suicide

तिच्या लग्नाला अवघे काही तास उरले होते. तिने तिच्या हातांवर मेहंदीही काढली होती. नव्या जोडीदारासोबत ती नवे आयुष्य सुरु करणार होती. मात्र हे सगळे फक्त कल्पनेतच राहिले. कारण ज्या हातांवर तिने मेहंदी काढली होती त्याच हाताने त्या तरूणीने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. पिंपरी चिंचवडमध्ये मन सून्न करणारी ही घटना घडली आहे. १४ डिसेंबरला सीमा सकारे या २२ वर्षीय तरूणीचा विवाह होणार होता. मात्र या तरूणीने रात्री १०.३० च्या सुमारास गळफास घेतला आणि आयुष्य संपवले. तिच्या बहिणीने तिला या अवस्थेत पाहिले आणि आरडाओरडा केला तेव्हा ही घटना उघडकीस आली.

मंगळवारी म्हणजेच १२ डिसेंबरला सीमाच्या घरी तिच्या लग्नाची चांगलीच तयारी सुरु होती. तिचे आई वडिल खरेदीत गुंतले होते. संध्याकाळी सीमाने हातावर मेहंदीही काढली. काही खरेदी बाकी होती म्हणून तिचे आई वडिल बाहेर गेले होते. त्याचवेळी सीमाची बहिण आणि सीमा अशा दोघीच घरात होत्या. सीमा तिच्या खोलीत गेली आणि तिने गळफास लावून आत्महत्या केली. सीमाच्या बहिणीने जेव्हा सीमाला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले तेव्हा आरडाओरडा केला. तिला खाली उतरवण्यात आले आणि रूग्णालयातही नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सीमाने आत्महत्या का केली? याचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. मात्र या घटनेने सीमाच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: