राष्ट्रीय

शिवसेनेच्या महिलांकडून धुलाई छेड काढणाऱ्या एसटी मेकॅनिकल .

या मेकॅनिकची शिवसेनेच्या महिलांनी बसस्थानकात चांगला चोप देत धुलाई केली.

jalgaon_st_marhan

जळगाव : एसटी आगारातील यांत्रिक विभागातील भुसावळ येथील प्रशिक्षणार्थी महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग करणाऱ्या आदील अहमद शेख मेकॅनिकची शिवसेनेच्या महिलांनी बसस्थानकात चांगली  धुलाई केली.

जळगाव एसटी अागारामध्ये प्रशिक्षणासाठी अालेल्या मेकॅनिकल तरुणीची छेड काढणाऱ्या इलेक्ट्रिशियनची शिवसेनेच्या महिलांनी धुलाई केली. या मवाल्याला अर्धा तास जमिनीवर लाेळवून लाथा, बुक्के, चपलांनी मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. बुधवारी नवीन बसस्थानकामध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी तरुणीने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ येथील तरुणी २२ डिसेंबरपासून एसटी अागारामध्ये प्रशिक्षणासाठी अाली आहे. ड्यूटीच्या तिसऱ्याच दिवशी म्हणजे २५ डिसेंबर रोजी मेकॅनिकल विभागातील इलेक्ट्रिशियन आदिल अहमद शेख याने संबंधित तरुणीची छेड काढली. तरुणीने वारंवार अादिलपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील त्याने तिच्यासोबत असभ्य वर्तणूक केली. आदिलच्या कृत्यामुळे तिला रडू कोसळले. सोबत असलेली एक महिला कर्मचारी घेऊन तिने माेठ्या धाडसाने अागारातील वरिष्ठांकडे तक्रार अर्ज दिला; पण दुर्दैवाने त्यावर काहीच ठाेस कारवाई झाली नाही. त्यामुळे नाइलाजाने तरुणीने शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांजवळ आपबीती कथन केली. बुधवारी आदिल ड्यूटीवर असताना सकाळी ११ वाजता पीडित तरुणीसह शिवसेनेच्या महिला पदाधिकारी शोभा चौधरी, रत्ना अत्तरदे, छाया पाटील, ज्योती शिवदे आदी महिलांनी आदिलला बसस्थानकात गाठले. या वेळी पीडित तरुणीसह शिवसेनेच्या महिलांनी आदिलची लाथा-बुक्के, चपलेने धुलाई केली. या वेळी बसस्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. मात्र, आदिलने केलेल्या कृत्यामुळे कोणीही त्याचा बचाव करण्यासाठी पुढे आले नाही. याउलट लोकांनीदेखील संताप व्यक्त केला होता. या वेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख गजानन मालपुरे, मोहन तिवारी, प्रवीण कोल्हे उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: