आंतराष्ट्रीय

‘चप्पल चोर पाकिस्तान!’ अमेरिकेत घोषणाबाजी

कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांच्या अपमानाचे पडसाद आता अमेरिकेतही उठले आहेत. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमधील पाकिस्तानच्या दूतावासा बाहेर भारतीय आणि बलूच नागरिकांनी तीव्र निदर्शनं केली.

chappalchorpakistan

भारतीय नौदलाचा माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीला पाकिस्ताननं दिलेल्या अपमानास्पद वागणुकीच्या निषेधाचा ‘आवाज’ अमेरिकेपर्यंत पोहोचला आहे. भारतीय-अमेरिकी आणि बलूच जनतेनं वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तान दूतावासाबाहेर आंदोलन केले. ‘हॅशटॅग चप्पलचोर पाकिस्तान’चे फलक हाती घेऊन पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीने त्यांची गेल्या महिन्यात पाकिस्तानात भेट घेतली होती. त्यावेळी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी त्यांना बूट, मंगळसूत्र आणि बांगड्या काढायला लावल्या होत्या. पाकिस्ताननं जाधव यांची आई आणि पत्नीचा अपमान केल्यानं भारतानंही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला होता. भारतीय जनतेनंही संताप व्यक्त केला होता. या संतापाची लाट आता अमेरिकेतही उसळली आहे. वॉशिंग्टनमधील पाकिस्तान दूतावासाबाहेर भारतीय-अमेरिकी आणि बलूच नागरिकांनी पाकिस्तानच्या या कृतीचा निषेध केला आहे. या कृत्यातून पाकिस्तानच्या वाईट आणि संकुचित मानसिकतेचं दर्शन झालं आहे, असं आंदोलकांचं म्हणणं आहे. ‘पाकिस्तानचा अर्थ काय आहे? अमेरिकेकडून डॉलर आणि भारताकडून चपला खाणं!’ अशी घोषमाबाजीही केली.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: