मुंबई

मनसेला सोडणाऱ्या सहा नगरसेवकांचा दोन दिवसांत होणार निकाल ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या मुंबईतील सहा नगरसेवकांचा लवकच फैसला होण्याची शक्यता आहे.

shivsena

मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी पक्षीय बलाबल अत्यंत अटीतटीचे असल्याने मनसेतून शिवसेनेत आलेल्या सहा नगरसेवकांवर शिवसेनेची मदार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळेच त्यांच्याबाबत कोकण आयुक्त काय निर्णय देणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. येत्या एक दोन दिवसांत याबाबत आयुक्तांकडून निकाल दिला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये अगदी काट्याची टक्कर झाली. पण स्पष्ट बहुमत कोणालाही मिळाले नाही. शिवसेनेने भाजपपेक्षा तीन जागा जास्त मिळवल्या. पण शिवसेना खरी सत्ते आली ती मनसेच्या सहा आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर. भाजपने काहीही झाले तरी मुंबईत आमचीच सत्ता असेल असे दावे केले होते. पण त्यापूर्वीच शिवसेनेने मनसेचे सहा नगसरेवक फोडले आणि संपूर्ण चित्रपट पालटले. पण मनसेने या नगरसेवकांच्या विरोधात धाव घेत त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. तर या सहा नगरसेवकांनी आयुक्तांकडे त्यांचा स्वतंत्र गट स्थापण्याची परवानगी मागितली आहे. जवळपास तीन महिन्यांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. मात्र आता लवकरच या प्रकरणाचा निकाल लागणार असल्याने पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष याकडे वळले आहे. या प्रकरणी जर मनसेच्या बाजुने निकाल लागला तर शिवसेनेला पुन्हा एकदा अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

मनसेतून शिवसेनेत आलेले नगरसेवक  

हर्षला मोरे

अश्विनी माटेकर

अर्चना भालेराव

दिलीप लांडे

दत्ताराम नरवणकर

परमेश्वर कदम

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: