तंत्रज्ञान

सॅमसंगचा Galaxy J2 Pro बजेट स्मार्टफोन लाँच

स्मार्टफोन सॅमसंगनं गॅलक्सी J2 प्रो (2018) नुकताच लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत जवळजवळ 9,000 रुपये आहे.

Samsung-j2-pro-2018

मुंबई : सॅमसंगनं आपला नवा स्मार्टफोन गॅलक्सी J2 प्रो (2018) लाँच केला आहे. सॅमसंगच्या वेबसाईटवर हा स्मार्टफोन लिस्ट करण्यात आला आहे. या बजेट स्मार्टफोनचे फीचर मागील महिन्यातच लीक झाले होते. त्यानंतर आता हा फोन लाँच करण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये 5 इंच डिस्प्ले असून जे एमोलेड (540×960)आहे. यामध्ये 1.4 Ghz क्वॉड कोअर प्रोसेसर देण्यात आलं आहे. तसंच यामध्ये 1.5 जीबी रॅम देण्यात आली असून त्याची मेमरी 16 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

J2 प्रो (2018) मध्ये 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे. तसंच यामध्ये अँड्रॉईड नॉगट ही ऑपरेटिंग सिस्टमही देण्यात आली आहे.

या स्मार्टफोनमध्ये 2600 mAh रिमूव्हेबल बॅटरी देण्यात आली आहे. तसंच यामध्ये ब्ल्यूटूथ, यूएसबी पोर्ट, हेडफोन जॅक यासारखे फीचरही देण्यात आले आहेत.

गॅलक्सी J2 प्रो (2018) या स्मार्टफोनची किंमत जवळजवळ 9,000 रुपये आहे. खास गोष्ट म्हणजे गॅलक्सी J2 प्रो ची किंमत 9890 रुपये एवढी होती.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: