क्रिकेट

रोहित शर्माचं जबरदस्त द्विशतक , श्रीलंकेला 393 धावांचे लक्ष्‍य.

भारताचा हिटमॅन रोहित शर्माने मैदानावर जबरदस्त द्विशतक ठोकेलय.

rohit

श्रीलंकेविरुद्धच्‍या दुस-या वनडे सामन्‍यात भारताने श्रीलंकेला विजयासाठी 393 धावांचे लक्ष्‍य दिले आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्‍या टीम इंडियाने शानदार फलंदाजी करत 50 ओव्‍हरमध्‍ये 392 धावा केल्‍या. यासाठी भारताने 4 विकेट्स गमावले. यामध्‍ये कर्णधार रोहित शर्माने 208 धावांची नाबाद खेळी केली.

सामन्‍यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने शानदार फलंदाजी करत वनडे करिअरचे 16वे शतक लगावले आहे.
रोहितने 100 धावा 115 चेंडूत पूर्ण केल्‍या. यादरम्‍यान त्‍याने 9 चौकार आणि 1 षटकार लगावला. रोहितने सुरुवातीच्‍या 50 धावा 65 चेंडूत पूर्ण केल्‍या.

करिअरचा दुसरा वनडे सामना खेळणारा श्रेयस अय्यरने या सामन्‍यात अर्धशतक लगावले आहे. अय्यरने 50 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्‍या. या खेळीमध्‍ये अय्यरने 5 चौकार लगावले.

सामन्‍यात शिखर धवनने शानदार फलदांजी करत करिअरचे 23वे अर्धशतक झळकावले.
67 चेंडूत 68 धावा करुन शिखर धवन आऊट झाला. आपल्‍या खेळीमध्‍ये शिखरने 9 चौकार लगावले. केवळ 47 चेंडूत शिखरने आपले अर्धशतक पूर्ण केले.

पंजाबमधील माेहालीत अातापर्यंत सर्वाधिक २३ वनडे सामने खेळले अाहे. यातील १९ वनडे सामने भारतानेच खेळले अाहेत. लकी असलेल्या याच मैदानावर भारताला १४ वनडेत विजयश्री मिळवता अाला. त्यामुळे या मैदानावरील अापली विजयी लय कायम ठेवण्याचा यजमानांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे श्रीलंकेने या मैदानावर तीन सामने खेळले. यातील दाेन सामन्यात पाहुणी श्रीलंकन टीम विजयी झाली हाेती.

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धाेनी अाता बुधवारी माेहालीच्या मैदानावर उतरताच दादा साैरव गांगुलीच्या कामगिरीशी बराेबरी साधेल. धाेनीचा अापल्या करियरमधील हा ३११ वा वनडे सामना अाहे. यासह ताे गांगुलीच्या ३११ वनडे खेळण्याच्या कामगिरीशी बराेबरी साधणार अाहे. भारताकडून सर्वाधिक ४६३ वनडे खेळण्याची नाेेंद सचिनच्या नावे अाहे. द्रविड ३४४ वनडेसह दुसऱ्या स्थानावर अाहे.

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: