तंत्रज्ञानतंत्रज्ञानमहाराष्ट्र

5000 रुपयांपेक्षाही कमी किंमत Redmi 5a लॉन्च

एमआय ने आपल्या रेडमी सीरिजचा नवा स्मार्टफोन (Redmi 5A) लॉन्च केला आहे.

redmi

मुंबई : मोबाईलप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, मोबाईल निर्माता कंपनी एमआयने आपल्या रेडमी सीरिजचा नवा स्मार्टफोन (Redmi 5A) लॉन्च केला आहे.

काही दिवसांपूर्वीच हा फोन कंपनीने बाजारात लॉन्च केला होता. तेव्हापासून गॅझेटप्रेमी या फोनची आतुरतेने वाटत पाहत होते. मात्र, आता युजर्सची प्रतिक्षा संपली आहे.

8 दिवस चालणार बॅटरी

Xiaomi Redmi 4A च्या यशानंतर कंपनीने रेडमी सीरिजचा नवा Redmi 5A स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला आहे. या फोनमध्ये मेटल टेक्स्चर देण्यात आलं आहे. इतकचं नाही तर हा फोन एकदा चार्ज केल्यानंतर त्याची बॅटरी 8 दिवस चालणार असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

Redmi 4Aचं अपग्रेड व्हर्जन

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या फोनचं वजन केवळ 137 ग्रॅम आहे. या फोनचं मार्केटींग कंपनीतर्फे ‘देशाचा स्मार्टफोन’ अशी करत आहे. Redmi 5A मध्ये मीयूआय 9 आधीपासूनच लोड करण्यात आलं आहे. यामुळे स्मार्टफोनची बॅटरी चांगल्या प्रकारे काम करते. हा फोन म्हणजे Redmi 4Aचं अपग्रेड व्हर्जन असल्याचं बोललं जात आहे.

मायक्रोएसडी कार्ड स्लॉटसोबत लॉन्च

चीनमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या Redmi 5A च्या तुलनेत भारतात लॉन्च केलेल्या या फोनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. भारतीय बाजारात हा फोन मायक्रोएसडी कार्ड स्लॉटसोबत लॉन्च करण्यात आला आहे. तर, चीनमध्ये हायब्रिड ड्युअल सिम स्लॉट देण्यात आलं आहे.

फोनचे फिचर्स

भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आलेल्या या फोनमध्ये 3 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेज देण्यात आलं आहे. तर, चीनमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या फोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज देण्यात आलं आहे.

डिस्प्ले

Redmi 5A हा स्मार्टफोन एंड्रायड नूगा वर आधारित मीयूआई 9 वर चालतो. फोनमध्ये 720X1280 पिक्सल रिझॉल्युशन असलेला 5 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच क्वाड-कोअर 425 प्रोसेसर देण्यात आला आहे.

रॅम आणि मेमरी

शाओमीच्या Redmi 5A या स्मार्टफोनमध्ये 2 GB आणि 3 GB रॅमसह बाजारात उपलब्ध आहे. 2GB असलेल्या व्हेरिएंटमध्ये 16GB इंटरनल स्टोरेज आणि 3GB असलेलं व्हेरिएंटमध्ये 32 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. मायक्रोएसडी कार्डसह मेमरी 128 GB पर्यंत वाढवता येणार आहे.

फोनमध्ये 3000 mAhची बॅटरी देण्यात आली आहे. ज्याचा 8 दिवस स्टँडबाय टाईम आणि 7 तासापर्यंत व्हिडिओ प्लेबॅक टाईम देण्यात आला आहे.

कॅमेरा

फोनमध्ये एचडी फ्लॅश आणि पीडीएएफसोबत 13MP रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ चॅट करणाऱ्या शौकीनांसाठी अपर्चर एफ/2.0 सोबत 5 MP कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हीटीसाठी फोनमध्ये 4जी वीओएलटीई, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 4.1, जीपीएस/ए-जीपीएस, इन्फ्रारेड, एक 3.5 एमएम ऑडिओ जैक और माइक्रो-यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे.

किंमत

शाओमी रेडमी 5ए (Xiaomi Redmi 5A) के 2 GB रॅम आणि 16 GB स्टोरेज असलेल्या वेरिएंट फोनची किंमत 5,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, 3 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 6,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

जर तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असेल तर, 7 डिसेंबरपासून दुपारी 12 वाजता  www.flipkart.comwww.mi.com आणि एमआय होम स्टोर मिळणार आहे. हा फोन डार्क ग्रे, गोल्ड आणि रोज गोल्ड कलर मध्ये उपलब्ध आहे.

ही आहे खास ऑफर

  • लॉन्च ऑफरनुसार, Redmi 5A च्या 2GB रॅममध्ये 16GB स्टोरेज असलेला फोन खरेदी केल्यास तुम्हाला 1000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. मात्र, कंपनीने ही ऑफर सुरुवातीच्या 5 मिलियन (50 लाख) ग्राहकांना देत आहे. या ऑफरनुसार तुम्हाला फोन 4,999 रुपयांत मिळणार आहे.
तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: