क्राइम पुणे

पुण्यातील कोंढव्यात रिक्षाचालकाचा महिलेवर बलात्कार,दोघांना अटक.

मित्राच्या मदतीने रिक्षाचालकाने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली आहे.

rape 2

पुण्यात रिक्षा चालकाने एका तरूणीवर अत्याचार केले आहेत, एवढंच नाही तरूणीला निर्जन स्थळी नेऊन, या मुलीवर अत्याचार केले, असल्याचं सांगण्यात येत आहे.

तरूणी आपल्या घरातील लोकांशी रागावून, घर सोडून निघून रस्त्यावर आली असताना, तिचा फायदा रिक्षा चालकाने घेत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुण्यात ही दुसरी धक्कादायक घटना आहे, गुरूवारी एका अल्पवयीन मुलीच्या रस्त्यावर छेडछा़ड करून, तिला मारहाण केल्याचा व्हि़डीओ व्हायरल झाल्यानंतर ही दुसरी घटना समोर आली आहे.

महाराष्ट्रातून शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थीनी पुण्यात येतात, त्यात आयटी क्षेत्रासाठीही पुणे चांगले मानले जाते, म्हणून पुण्यात सध्या तरूण तरूणींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, अशा घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: