राष्ट्रीय

प्रद्युम्न हत्या ,अल्पवयीन आरोपी सज्ञाना प्रमाणे खटला चालणार,ज्युवेनाईल कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रद्युम्न ठाकूर या 8 वर्षाच्या मुलाची चाकूने गळा चिरून हत्या करण्यात आली होती.

pradyuman-case

हरियाणाच्या गुरुग्राममधील प्रद्युम्न हत्याकांडातील आरोपी विद्यार्थ्याला सज्ञान समजलं जाईल आणि त्यानुसारच त्याच्यावर खटला चालणार आहे. ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाने हा महत्त्वपूर्ण निकाल असून हे प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग केला आहे.  असा महत्त्वपूर्ण निर्णय ज्युवेनाईल कोर्टाने दिला आहे. ज्युवेनाईल कोर्टाने हा निर्णय देताना प्रद्युम्न हत्या प्रकरण जिल्हा आणि सेशन कोर्टात वर्ग केलं आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी 22 डिसेंबर रोजी होणार आहे.

8 सप्टेंबर रोजी गुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रद्युम्न ठाकूर या 8 वर्षाच्या मुलाची चाकूने गळा चिरून हत्या करण्यात आली होती. प्रद्युम्नच्या हत्येनंतर शाळेतील मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. मुलांच्या शाळेतील सुरक्षेबाबत पालकांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने ज्युवेनाईल कोर्टात याचिका दाखल करुन अल्पवयीन आरोपीवर सज्ञानाप्रमाणे खटला चालवण्याची मागणी केली होती. तसंच प्रद्युम्नच्या पालकांनीही आरोपीवर सज्ञानाप्रमाणे खटला चालवण्याची मागणी होती. कोर्टाने या याचिकेवर सुनावणी करताना सीबीआयच्या मागणीला परवानगी दिली.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: