सिनेमा

‘खिलाडी ४२०,’फिर हेरा फेरी’चे दिग्दर्शक अभिनेते नीरज व्होरा यांचे निधन.

प्रसिद्ध अभिनेते नीरज व्होरा यांचं आज पहाटे चारच्या सुमारास निधन झालं.

neerajvora‘दौड’, ‘मन’, ‘सत्या’, ‘रंगीला’, ‘हेरा फेरी,’बादशाह’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमुळे घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी पहाटे मुंबईत निधन झाले. ते ५४ वर्षाचे होते. गेल्या दहा महिन्यांपासून ते कोमामध्ये होते. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू कलाकार हरपल्याची भावना सिनेवर्तुळात व्यक्त होत आहे. सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नीरज व्होरा यांना गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये हृदयविकाराच्या धक्क्यानंतर ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर गेल्या दहा महिन्यांपासून ते कोमात होते. नीरज यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. पण त्यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाल्यानंतर निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी त्यांची जबाबदारी स्वीकारत त्यांना मुंबईत आणले होते. नाडियाडवालांच्या जुहूमधील बरकत व्हिलामध्ये त्यांना हलवण्यात आले होते. काही महिन्यांपासून नाडियाडवालांच्या घरातील एका रुमचं रुपांतर आयसीयूमध्ये करण्यात आलं होतं. त्यांच्या उपचारांसाठी ऑडिओ थेरपीचा वापरही करण्यात येत होता. विशेष म्हणजे व्होरांच्या या रुममधील भिंतींवर त्यांच्या गाजलेल्या सिनेमांची पोस्टर्स लावण्यात आले होते. गेले काही महिने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती, पण आज पहाटे चारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

‘कंपनी’, ‘पुकार’, ‘रंगीला’, ‘सत्या’, ‘बादशाह’, ‘मन’ यासारख्या अनेक चित्रपटात त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. ‘अकेले हम अकेले तुम’, ‘रंगीला’, ‘चोरी चोरी चुपके चुपके’, ‘जोश’, ‘बादशाह’, ‘हेरा फेरी’, ‘आवारा पागल दिवाना’ यासारख्या अनेक चित्रपटांचे लेखनही त्यांनी केले होते. तर ‘फिर हेरा फेरी’, ‘खिलाडी ४२०’ सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं.

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: