नाशिकमहाराष्ट्र

‘वजन’ वाढल्याने नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या इमर्जन्सी लँडिंग.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर पुन्हा एकदा बचावलं आहे. वजन जास्त झाल्याने टेक ऑफ झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं पुन्हा एकदा लँडिंग करावं लागलं असल्याची माहिती समोर आली आहे.

HELICOPTER

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचे नाशकात पुन्हा एकदा इमर्जन्सी लॅंडींग केले. हेलिकॉप्टरमध्ये मर्यादेपेक्षा जास्त वजन झाल्याने इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. अखेर त्यांचा खानसामला खाली उतरल्यानंतर हेलिकॉप्टर औरंगाबादकडे रवाना झाले आहे.

मुख्यमंत्री आज(शनिवार) औरंगाबादच्या दौर्‍यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सकाळी राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले. राष्‍ट्रीय विधी विद्यापीठाला लागणार्‍या आवश्यक सर्व पायाभूत सुविधा देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. जालन्यात आयसीटीसाठी जागा दिली आहे आहे. तसेच स्कूल ऑफ आर्किट्रेक्चर देखील लवकरच सुरु करण्यात येईल असे मुख्यमंत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री गंगापूरकडे निघाले. मात्र, हेलिकॉप्टरमध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी होते. त्यामुळे नाशकात हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागले. अखेर त्यांचा खानसाम सतीशला उतरवल्यानंतर हेलिकॉप्टरने पुन्हा टेकऑफ केले. हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्र्यांसह गिरीश महाजन आणि स्वीय सचिव औरंगाबादला रवाना झाले.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बराच सामानही आहे. त्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये सामानाचे वजन मर्यादेपेक्षा जास्त झाल्याने वैमानिकाने नाशिकमध्ये सकाळी इमर्जन्सी लॅंडिंग केले. मुख्यमंत्री औरंगाबादेत पोहोचले असून ते सुखरुप असल्याचे सूत्रांनी सांगितले आहेत.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: