क्राइम

मुंबई: स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पूनम यांचा बंद फ्लॅटमध्ये मृतदेह आढळला .

अंधेरीमध्ये घरात एका महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्याने आजुबाजुच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

mumbai_doctor

मुंबई : अंधेरीमध्ये घरात एका महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्याने आजुबाजुच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पूनम यांचा मृत्यू मागील दोन-तीन दिवसापूर्वी झाला असावा. शेजा-यांना त्यांच्या फ्लॅटमधून वास येऊ लागल्यानंतर याची पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, सातपुते यांचा मृत्यू नैसर्गिक आहे की हत्या, आत्महत्येचा प्रकार हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, सातपुते यांना डायबेटिसचा त्रास होता त्यामुळे तर त्यांचा मृत्यू झाला नाही ना याचा तपास सुरू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूनम यांचा मृत्यू मागील दोन-तीन दिवसापूर्वी झालेला असावा. घरातून वास येऊ लागल्याने शेजा-यांनी पोलिसांना बोलावलं. त्यानंतर पोलिसांनी डॉ. पूनम यांचा मृतदेह कूपर हॉस्पिटलमध्ये नेला. तेथे पोस्ट मॉर्टेम करण्यात येणार असून, त्यानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण कळू शकेल.

डॉ. सातपुते यांचे मालाड येथे क्लिनिक होते. शिवाय अनेक हॉस्पिटलमध्ये ती कन्स्लंटंट म्हणून काम पाहत होत्या. 50 वर्षाच्या डॉ. पूनम या एकट्याच चार बंगला परिसरातील फ्लॅटमध्ये राहत होत्या. त्यांचे 81 वर्षीय जवळच्या परिसरात राहतात. पूनम यांना डायबेटिस होता व तो टाईप- 3 होता त्यामुळे त्यांना ह्दयविकाराचा झटका अाला असावा अशी शक्यता आहे. कारण त्यांचे घराचा दरावाजा आतून लॉक होता व घरातील सर्व सामान जसेच्या तसे आहे. तसेच पूनम यांच्या बॉडीवर कोणतेही दुखापत, इजा झालेली नाही.

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: