महाराष्ट्र मुंबई

‘ओखी’चा धोका टळला, आजही पावसाची शक्यता.

महाराष्ट्र व गुजरातमध्ये पुढील दोन दिवस पाऊस .

mumbai-cyclone-ockhi

 

मुंबईवरचे ‘ओखी’ चक्रीवादळाचे संकट टळले आहे. मात्र, खोल समुद्रात घोंघावणाऱ्या या चक्रीवादळामुळे मुंबई आणि उपनगरांत सोमवारी रात्रीपासून बेमाेसमी पावसाने रिमझिम हजेरी लावली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह समुद्राला आलेल्या भरतीमुळे किनाऱ्यावर पाच मीटरपेक्षा उंच लाटा उसळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी तसेच चौपाट्यांवर न जाण्याच्या सूचना मुंबई पोलिसांनी नागरिकांना दिल्या आहेत.

पाऊस, दाट धुके यामुळे शहरात मंगळवारी ठिकठिकाणी रस्ते वाहतूक मंदावली होती. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. उपनगरी लोकलही १० ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. दरम्यान, मंगळवारी रात्री उत्तर महाराष्ट्रासह दक्षिण गुजरातमध्ये वादळ धडकण्याची शक्यता गृहित धरुन बॉम्बे पोर्ट ट्रस्ट, जेएनपीटी, नौदल, मेरिटाइम बोर्ड, महापालिका, मत्स्य व्यवसाय विभाग, मुंबई पाेलिस सतर्क हाेते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तीन तुकड्या मुंबईत तैनात करण्यात आल्या असून राज्य आपत्ती प्रतिसाद पथकास दक्ष राहण्यास सांगितले आहे. किनारपट्टीच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि महापालिकांचे आयुक्त यांचा व्हाॅट्सअॅप ग्रुप बनवण्यात आला असून त्यावर वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. मुंबई परिसरात बुधवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यातही असेच हवामान राहील, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: