राष्ट्रीय

राज्यातील बिनकामाचे आमदार 288 शिवरायांच्या नावाचा वापर : संभाजी भिडे

राज्यात शिवरायांचे हजारो पुतळे हे राज्यकर्त्यांचे केवळ नाटक

sambhaji_bhide

कोल्हापूर- राज्यातील 288 आमदार हे बिनकामाचे आहेत. शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर राज्यकर्त्यांनी आपल्या सोयीस्कर राजकारणानुसार केला, असा आरोप शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केला आहे.

तासगावमध्ये शिवप्रतिष्ठानच्यावतीने गडकोट मोहिम आणि 32 मन सुवर्ण सिंहासन पुर्नस्थापना या विषयावर ही बैठक आयोजित केली होती. आतापर्यंत शिवरायांच्या नावाचा वापर राज्यकर्त्यांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी केल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यात शिवरायांचे हजारो पुतळे उभे केले आहेत, हे राज्यकर्त्यांचे केवळ नाटक आहे, असेही भिडे गुरुजी म्हणाले.

“आजपर्यत शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर राज्यकर्त्यांनी आपल्या सोयीस्कर राजकारणानुसार केला. या लोकांना शिवरायांच्या विचारांशी, त्यांच्या कार्याशी देणे घेणे नाही. प्रतापगडाच्या कुशीत शिवरायांचे स्मारक व्हावे यासाठी सध्या कुणीच प्रयत्न करत नाही. त्यामुळे राज्यातील 288 आमदार हे जवळसपास बिनकामाचे आहेत”, असं भिडे म्हणाले.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: