क्राइम

लहान मुलींवर बलात्कार वाच्यता न करण्यासाठी दिले होते ५-५ रुपये .

चॉकलेट आणि मिठाई देण्याचे आमीष दाखवून नराधमाने दोघींना घरात नेले

Rape

अल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरणी ६० वर्षाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या पालममध्ये ही घटना समोर आली आहे. पाच आणि नऊ वर्षांच्या लहान मुलींवर बलात्कार करणाऱ्या ६० वर्षांच्या नराधमाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या नराधमाने पीडित मुलींनी या प्रकाराची वाच्यता करु नये यासाठी त्यांना ५ रुपये देखील दिले होते, अशी माहिती समोर येत आहे.

दिल्लीत राहणारा मोहम्मद जैनूल (वय ६०) हा बिगारी कामगार असून रविवारी संध्याकाळी त्याने घराबाहेर खेळणाऱ्या दोन लहान मुलींना गाठले. दोघींचे आई-वडिल हे कामासाठी बाहेर गेले होते. त्यांना चॉकलेट आणि मिठाई देण्याचे आमीष दाखवून नराधमाने दोघींना घरात नेले. यानंतर त्याने दोघींवर बलात्कार केला. बलात्कारानंतर त्याने दोघींना पाच रुपये दिले आणि या प्रकाराची वाच्यता करु नका असे सांगितले. त्याने दोघींना धमकी देखील दिली होती. यामुळे दोन्ही मुली घाबरल्या होत्या. रात्री उशिरा यातील एका मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिने रडत रडत आईला घडलेला प्रकार सांगितला. पीडित मुलीच्या आईने यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पोलिसांनी सुरुवातीला दोन्ही मुलींशी समुपदेशकाच्या माध्यमातून संवाद साधला. यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करत आरोपीचा शोध सुरु केला. नराधम मोहम्मद जैनूल हा विवाहित असून त्याला मुलं देखील आहेत. घटनेच्या वेळी त्याची पत्नी आणि मुले कामानिमित्त बाहेर गेली होती. पोलिसांनी मोहम्मद जैनूलला अटक केली आहे.

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: