क्राइम पुणे

पुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार .

Rape

पिंपरी-चिंचवडमधील सांगवी पोलिस हद्दीत वडिलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. सावत्र बापाकडून आपल्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे मोठ्या मुलीवरही वाईट नजर ठेऊन तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो या नराधाम बापाने काढले आहेत. मात्र याप्रकरणी अद्याप आरोपीला अटक केलेली नाही.

१५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला घरात थांबवून हा नराधम बाप तिच्यावर अत्याचार करत होता. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या प्रकाराची वाच्यता न करण्याची धमकीही त्याने तिला दिली होती. हा नराधम  १५ वर्षांच्या मुलीला रोज मारहाणही करत होता अशी माहितीही पोलिसांनी दिली. १५ वर्षांच्या मुलीने रोज होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून आईसह पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला आहे. तसेच पोलीस या नराधमाचा शोध घेत आहेत.

मोठ्या मुलीवर वाईट नजर ठेवत त्याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने या सगळ्या प्रकाराला कडाडून विरोध केला. तेव्हा या मुलीचे अर्धनग्न फोटो काढून तिला जिवे मारण्याची धमकीही या नराधमाने दिली. आता पोलीस या नराधमाचा शोध घेत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका सगर या प्रकरणाचा तपास करत आहेत.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: