राष्ट्रीय

लव्ह जिहादच हत्या करून तरूणाचा मृतदेह जाळला, रेकॉर्ड केलेला व्हिडीओ व्हायरल.

व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी शंभूनाथला अटक केली आहे

love‘लव्ह जिहाद’च्या संशयावरून एका तरुणाची निर्घृण हत्या करून मृतदेह जाळल्याची घटना राजस्थानमधील राजसमंदमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात तणाव निर्माण झाला आहे. परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

शंभूनाथ (वय ४५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कुऱ्हाडीने वार करून तरुणाची हत्या केल्यानंतर मृतदेह जाळताना तो या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ‘लव्ह जिहाद’ संपला नाही तर प्रत्येक भारतीयाला अशा भयानक परिस्थितीचा सामना करावा लागेल, अशी धमकी त्याने दिली आहे.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ माजली आहे. राजसमंद परिसरातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. राजसमंद आणि परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, असे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी सांगितले. एखाद्याची हत्या करून त्याचे चित्रण कसे करू शकतात? ही धक्कादायक घटना आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: