
रांची- चारा घोटाळ्यातील दोषी लालू प्रसाद यादव यांना रांचीतील सीबीआयच्या विशेष कोर्टाने साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल ३ जानेवारीलाच लागणार होता मात्र तीनवेळा लालूप्रसाद यादव यांना शिक्षा सुनावण्याची प्रक्रिया लांबवणीवर टाकण्यात आली. तसंच पाच लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लालू प्रसाद यादव यांना शिक्षा सुनावली गेली.
तुमची प्रतिक्रिया नोंदवा