राजकीयराष्ट्रीय

पत्रकारांनी टाकला जिग्नेश मेवाणींवर बहिष्कार

Gujarat Rashtriya Dalit Adhikar Manch leader Jignesh Mevani addressing a press conference in New Delhi on wednesday.
Express photo by Renuka Puri

दलित नेता आणि गुजरातमधील वडगामचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी यांच्या संमेलनावर पत्रकारांनी बहिष्कार टाकला आहे. चेन्नई येथे एका कार्यक्रमासाठी मेवाणी उपस्थित होते. त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर काही पत्रकारांनी त्यांना सध्या सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य करण्यासाठी विचारणा केली. यावेळी रिपब्लिक वृत्तवाहीनी या इंग्रजी माध्यमाच्या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देण्यास त्यांनी नकार दिल्याने सर्व पत्रकारांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला आहे.
मेवाणी यांची बाईट घेण्यासाठी पत्रकारांनी मायक्रोफोन लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी मायक्रोफोन काढण्यास सांगितले. त्यावेळी आपल्याला सामान्य प्रश्न विचारायचे असून कोणतीही विशेष मुलाखत घ्यायची नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र तरीही त्यांनी या गोष्टीसाठी नकार दिल्याने पत्रकार चिडले आणि त्यांनी त्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. एका विशिष्ट वृत्तवाहिनीला नकार दिल्याच्या कारणावरुन सर्व पत्रकारांनी त्यांच्यावर बहिष्कार घातला. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: