राष्ट्रीय

इस्रोने रचला इतिहास लाँच केले 31 सॅटेलाइट उपग्रहांसह ‘पीएसएलव्ही सी-४०’

इस्त्रोने श्रीहरीकोटा या प्रक्षेपण केंद्रावरुन ३१ उपग्रह अंतराळात सोडून आतापर्यंत शंभर उपग्रह अंतराळात सोडण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.

isro

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने आज नवा इतिहास रचला. इस्त्रोने श्रीहरीकोटा या प्रक्षेपण केंद्रावरुन ३१ उपग्रह अंतराळात सोडून आतापर्यंत शंभर उपग्रह अंतराळात सोडण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. श्रीहरीकोटा येथून आज सकाळी ९.२९ वा पीएसएलव्ही सी ४०/कार्टोसॅट २ मिशनचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं.

पीएसएलव्ही सी ४० सोबत भारताने तब्बल ३१ उपग्रह अंतराळात सोडले. यामध्ये ३ भारताचे तर २८ उपग्रह अन्य ६ देशांचे आहेत. या सहा देशांमध्ये फ्रान्स, फिनलँड, कॅनडा, इंग्लंड, अमेरिका आणि दक्षिण कोरियाचा समावेश आहे. गेल्या वर्षी इस्रोचं पीएसएलव्ही सी ३९ हे मिशन अपयशी ठरलं होतं. त्यामुळे भारताच्या आजच्या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. या अपयशानंतरही इस्रोने पुन्हा जोमाने तयारी करुन, पीएसएलव्ही सी ४० या प्रक्षेपकाचं यशस्वी उड्डाण केलं.

दरम्यान, भारताने स्वत:चा एक १०० किलोचा मायक्रो आणि एक १० किलोचा नॅनो उपग्रह आज आंतराळात सोडला आहे. याशिवाय भारताचा सर्वात मोठा उपग्रह आहे तो म्हणजे कार्टोसॅट २ सीरिज उपग्रह. हा उपग्रह ७१० किलोग्रॅमचा असून कार्टोसॅट २ हा उपग्रह म्हणजे भारताचा ‘आकाशातील डोळा’ म्हणून ओळखला जात आहे.

 आकाशातून पृथ्वीचे फोटो घेण्याची क्षमता या उपग्रहात आहे. भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमांवर शत्रू राष्ट्रांवर नजर ठेवण्यासाठी हे महत्त्वाचं काम करणार आहे. हा उपग्रह पृथ्वीची अवलोकन करणारी उच्च दर्जाची छायाचित्र पाठवणार आहे.
तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: