राष्ट्रीय

INS ‘कलवरी’ नौदलात दाखल,भारताच्‍या समुद्री ताकदीचा मुकाबला नाही.

कलवरी ही स्कॉर्पियन श्रेणीतली उच्च दर्जाची पाणबुडी असल्यानं देशाच्या नौदलाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.

pandubi

स्‍कॉर्पिओ क्‍लासची पहिली पाणबुडी ‘कलावरी’ गुरुवारी नौदलाच्‍या ताफ्यात समाविष्‍ठ करण्‍यात आली. मुंबईच्‍या माजगाव डाकयार्डमध्‍ये नरेंद्र मोदींनी ही पाणबुडी नौदलाला समर्पित केली. यावेळी भारताच्‍या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, नौदल प्रमुख अॅडमिरल सुनिल लांबा, वाइस अॅडमिरल गिरीश लूथरा यांच्‍यासहीत अनेक अधिकारी उपस्थित होती. यावेळी मोदी म्‍हणाले की, 21व्‍या शतकाचा मार्ग हिंदी महासागरातूनच जाणार आह

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्‍हणाले, ‘भारताचा 7500 किमीचा समुद्री किनारा आणि 1300च्‍या जवळपास छोटेमोठे बेट हे अशा समुद्री शक्‍तीची निर्मिती करतात, ज्‍याचा जगात कोठेही मुकाबला नाही. हिंदी महासागर केवळ भारतासाठीच नव्‍हे तर संपूर्ण जगासाठी अतिशय महत्‍त्‍वाचा आहे. असे म्‍हटले जाते की, 21 वे शतक हे आशियाचे शतक आहे. आणि याचा मार्ग निश्चितच हिंदी महासागरातून जाणार आहे.’
ज्‍या पद्धतीने भारताचे आर्थिक आणि राजकीय संबंध वाढत आहेत त्‍यामुळे भारत आपले लक्ष्‍य गाठणे सोपे होणार असल्‍याचे दिसत आहे. देशाची समुद्री ताकदीमुळे देशाची आर्थिक ताकदही वाढते.’
समुद्री मार्गे येणारा दहशतवाद असो, पायरसीची समस्‍या असो नाहीतर ड्रग्‍स तस्‍करीचे आव्‍हान असो, या समस्‍यांचा निपटारा करण्‍यासाठी भारत सज्‍ज आहे. यामध्‍ये भारत भुमिका ही अतिशय महत्‍त्‍वाची असणार आहे. सब का साथ सबका विकास हा आमचा संकल्‍प जल-जमिन-आकाश सर्वांसाठी एकमसान आहे. आम्‍ही वसुधैव कुटुंबकम हा विचार समोर घेऊन आपली जबाबदारी पार पाडण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: