राष्ट्रीय

भारतीय नौसेनेत सहा नवीन परमाणू पाणबुड्या

हिंद महासागरात चीनची घुसखोरी वाढतच चालली आहे. इतकेच नाहीतर पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावरही चीनची लुडबूड वाढली आहे.

Indian submarine

हिंद महासागरात चीनची घुसखोरी वाढतच चालली आहे. इतकेच नाहीतर पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावरही चीनची लुडबूड वाढली आहे. या बंदरावरील चीनची असलेली नजर भारतासाठी पुढे मोठी समस्या बनू शकते.

नवीन परमाणू पाणबुड्यांच्या निर्माणाचं काम सुरू आहे. भारताकडे सध्या आयएनएस अरिहंत आणि आयएनएस चक्र नावाच्या दोन पाणबुड्या आहेत.

चीनची घुसखोरी

नौसेनेच्या प्रमुखांनी सांगितले की, भारतीय नौसेना हिंद महासागरच्या सर्वच सीमांवर लक्ष ठेवून आहे. चीनच्या पाणबुड्या लगातार हिंद महासागरात येत आहेत. जेव्हा भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका यांच्यात एकी झाली तर नौसेना हिंद महासागरात आपली भूमिका बजावेल.

महिला अधिकारी तैनात 

नौसेनेचे प्रमुख सुनील लांबा यांनी सांगितले की, नौसेना महिला अधिका-यांना युद्ध स्थळांवर जाण्याची परवानगी देणार आणि त्यांच्या नवनिर्मिती जहाजांवर योग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. आमच्या सर्वच नवीन जहाजांवर महिला अधिका-यांसाठी सुविधांची निर्मिती करण्याचे काम सुरू आहे.

नवीन लढाऊ विमानांसाठी प्रस्ताव

लढाऊ विमानांसाठी ५७ बहुउद्देशीय लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी ‘रिक्वेस्ट फॉर प्रपोजल’ २०१८ च्या मध्यात जारी केलं जाण्याची शक्यता आहे. यासाठी चार विमान निर्मिती कंपन्यांची पसंती दाखवली आहे. त्यांनी हेही सांगितलं की, पहिलं स्वदेशी विमानवाहून विमान २०२० पर्यंत पूर्ण होईल.

चेन्नईमध्ये नौसेनेचा बेस

भारतीय नौसेनेच्या एका वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले की, तामिळनाडूमध्ये ते बेस बनवण्याचा विचार करत आहेत. यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारसोबत बोलणी सुरू आहे.

कलवरी पाणबुडीचा समावेश

माझगांव डॉक लिमिटेड द्वारे भारतीय नौसेनेकडून सोपवण्यात आलेली स्कॉर्पीन श्रेणीच्या सहा पाणबुड्यांपैकी एक कलवरीचा लवकरच नौसेनेत सहभागी होणार आहे. कलवरीचं परीक्षण झाल्यानंतर याच महिन्यात तिचा नौसेनेत समावेश होण्याची आशा आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: