क्राइम पुणे

पुण्यात आई-वडिलांचा खून,मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न.

शनिवार पेठ येथे आईवडिलांची हत्या करुन मुलाने स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न.

crime

पुण्यातील शनिवार पेठ भागात एका ३० वर्षांच्या तरुणानं स्वत:च्या आई-वडिलांचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पराग क्षीरसागर असं आरोपी तरुणाचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पराग हा मानसिक रुग्ण होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यानं वडिलांना गळा चिरून मारलं, तर आईचा गळा दाबून खून केला. प्रकाश क्षीरसागर (६०) व आशा क्षीरसागर (५५) अशी मृतांची नावं आहेत. आई-वडिलांना मारल्यानंतर परागनं स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तो वाचला. परागला एक जुळा भाऊ असून तो यावेळी घरातच होता, अशी माहिती समोर आली आहे.

स्थानिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन याची माहिती दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दरम्यान, विश्रामबाग पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मुलाला ताब्यात घेतले आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: