आंतराष्ट्रीय

६८ व्यावर्षी इमरान खान लाहोरमध्ये तिस-यांदा केला निकाह

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि पाकिस्तान 'तहरीक-ए-इंसाफ'चा प्रमुख इमरान खान लाहोरमध्ये तिस-यांदा केला निकाह

इस्लामाबाद – पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)चे अध्यक्ष इमरान खान यांनी तिस-यांदा निकाह केला आहे. बुशरा मनेका असे त्यांच्या तिस-या पत्नीचं नाव आहे. रविवारी (18 फेब्रुवारी ) लाहोर येथे अगदी साध्या समारंभात त्यांनी आपला निकाह केला. पाकिस्तान तहरीक-ए- इन्साफ ( पीटीआय )चे प्रवक्ते फवाद चौधरी यांनी इमरान खान यांच्या तिस-या निकाहच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बुशरा मनेका यांच्या निवासस्थानी त्यांचा निकाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात केवळ जवळच्या नातेवाईकांना निमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान, इमरान खान यांच्या बहिणी निकाह सोहळ्या सहभागी झाल्या नव्हत्या. अवन चौधरी व जुल्फी बुखारी यांच्या उपस्थितीत त्यांचा निकाह झाला. चौधरी व बुखारी हे साक्षीदार म्हणून उपस्थित होते.

40 वर्षीय बुशरा मनेका यांचा यापूर्वी खवर फरीद मनेका यांच्यासोबत निकाह झाला होता. खवर फरीद मनेका हे इस्लामाबाद येथे वरिष्ठ कस्टम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी बुशरा यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

इमरान खान यांचा तिसरा निकाह
इमरान खान यांचे यापूर्वी दोनदा निकाह झाले आहेत. पहिली पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांच्यासोबत त्यांनी 1995 साली निकाह केला होता. 2004 मध्ये त्यांनी जेमिमा यांना घटस्फोट दिला. यानंतर दुसरी पत्नी रेहम खानसोबत 2015 मध्ये त्यांनी निकाह केला. मात्र 10 महिन्यांनंतर रेहम व इमरान यांनी स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: