क्रीडा

हिरोच्या Passion XPro, Passion Pro , Super Splendor तीन नव्या बाईक लाँच.

Passion XPro, Passion Pro , Super Splendor चे २०१८ चे मॉडेल यामध्ये असणार आहेत.

2018-hero-motorcycles

देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी असलेल्या ‘हीरो मोटोकॉर्प’ आज ३ नव्या मोटारसायकल लॉन्च करत आहे. Passion XPro, Passion Pro और Super Splendor चे २०१८ चे मॉडेल यामध्ये असणार आहेत.

सुपर स्प्लेंडर आणि पॅशन प्रो या आजही बाजारात उपलब्ध आहेत, मात्र नव्या गाड्यांमध्ये नवे बदल करुन, त्या पुन्हा बाजारात आणल्या जाणार आहेत.या तीनही मोटरसायकल कंपनीचं पेटंट असलेल्या इंधन बचतीचं i3s तंत्रज्ञानयुक्त आहेत. त्यामुळे पेट्रोल बचत होऊन, जास्त मायलेज मिळेल असा दावा कंपनीने केला आहे.हिरोने नव्या बाईक्स नव्या रंगात, नव्या ढंगात आणल्या आहेत. स्टाईल, इंजिन क्षमता आणि मायलेज हे या बाईक्सचं वैशिष्ट्य आहे.तीनही बाईक वेगवेगळ्या पाच रंगात उपलब्ध आहेत.

कंपनीने आज या बाईक्स लाँच केल्या असल्या, तरी येत्या वर्षात म्हणजेच पुढील महिन्यात त्याच्या किमती जाहीर करण्यात येणार आहेत.सध्याच्या किमतीपेक्षा या बाईक्सच्या किमती 700 ते 2 हजार रुपये महाग असण्याची शक्यता आहे.पुढील आठवड्यापर्यंत या गाड्या डिलर्सकडे पोहोचतील.

 

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: