आंतराष्ट्रीय

झुकलं पाकिस्तान, पुन्हा एकदा हाफिज सईदला अटक

Hafiz Saeedभारत आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तान नरमला असून काही दिवसांपूर्वीच नजरकैदेतून सुटका केलेला मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला पुन्हा ताब्यात घेतलं आहे. ‘टाइम्स नाऊ’नं यासंबंधी वृत्त दिलं आहे. मात्र, त्याला कोणत्या प्रकरणात ताब्यात घेतलं आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

जमात-उद-दावाचा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदच्या सुटकेनंतर भारतानं तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हाफिजला पुन्हा ताब्यात घ्या, असं अमेरिकेनंही म्हटलं होतं. भारत आणि अमेरिकेच्या दबावामुळं पाकिस्तान नरमला असून त्यांनी हाफिजला पुन्हा ताब्यात घेतलं असल्याचं सांगण्यात येतं. मात्र त्याच्याविरोधातील खटला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे संकेत आहेत. त्यामुळं न्यायालयाकडून त्याला दिलासा मिळू शकतो, असं आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या जाणकारांचं म्हणणं आहे. दरम्यान, आपला खरा चेहरा जगासमोर येऊ नये, यासाठी पाकिस्ताननं ही कारवाई केल्याचं सांगण्यात येत आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: