यवतमाळ

राज्यात समलैंगिक विवाह; यवतमाळच्या तरूणाने केला समलैंगिक विवाह

 यवतमाळमध्ये देशातील  समलिंगी विवाह सोहळा पडला. भारतात पार पडलेला हा कदाचित पहिलाच समलिंगी विवाह सोहळा आहे

gay-marriage-in-yavatmal

यवतमाळ : यवतमाळमध्ये देशातील  समलिंगी विवाह सोहळा पडला. भारतात पार पडलेला हा कदाचित पहिलाच समलिंगी विवाह सोहळा आहे.’लव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या यवतमाळ येथील एका तरुणाने इंडोनेशियातील त्याच्या मित्राशी विवाह केला. येथील एका पॉश हॉटेलात यवतमाळमधील हा पहिला समलैंगिक विवाह सोहळा पार पडला. या विवाहाची गुप्तता राखण्यात आली होती, मात्र सोशल मीडियावर या समलैंगिक विवाहाचे फोटो व्हायरल झाल्याने लग्नाचं बिंग फुटलं असून हे लग्न सध्या यवतमाळमधील चर्चेचा विषय ठरलं आहे.

३० डिसेंबर रोजी यवतमाळच्या स्टेट बँक चौकातील एका हॉटेलात हा विवाह सोहळा पार पडला. विशेष म्हणजे यावेळी देश-विदेशातील अवघे ७०-८० वऱ्हाड मंडळीच उपस्थित होती. येथील एका प्रसिद्ध पुस्तक विक्रेत्याचा मुलगा अमेरिकेत नोकरीला आहे. भरपूर पगार असूनही हा मुलगा लग्न करण्यास तयार नव्हता. समलैंगिक विवाह करणार असल्याचं त्यानं घरच्यांना सांगून टाकलं होतं. आपल्याच कार्यालयातील इंडोनेशियाच्या सहकाऱ्यावर आपलं प्रेम जडलं असल्याचंही त्यानं घरच्यांना सांगून टाकलं होतं. त्यामुळे त्याचे आई-वडील हादरून गेले होते. समाजात नाचक्की होईल आणि हे लग्न नंतर त्रासदायक ठरेल असं सांगत त्याला समजावण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण त्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्यानं लग्न करण्याचा हेकाच धरल्यानं घरच्यांनाही त्याच्या पुढे जाता आलं नाही.

घरच्यांनी नाइलाजास्तव येथील एका पॉश हॉटेलात त्याचं लग्न लावून दिलं. लग्नापूर्वी दोघांनाही हळद लावण्यात आली होती. लग्नाचे कपडे, वेडिंग रिंग, हार आणण्यात आले आणि वैदिक मंत्रोच्चारात त्यांचं लग्न धुमधडाक्यात लावून देण्यात आलं. या लग्न सोहळ्याला अमेरिका, चिनमधून त्याचे ५०-६० मित्र आले होते. त्यात १० समलिंगी जोडप्यांचाही समावेश होता. लग्नानंतर हे नव दाम्पत्य मात्र मधुचंद्राला निघून गेले आहे. मात्र दुसऱ्या दिवशी या समलिंगी विवाहाची वार्ता कळताच सर्वसामान्य यवतमाळकरांनी मात्र तोंडात बोटे घातली.

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा
Close
%d bloggers like this: