मुंबई

मुंबईच्या अंधेरीत इमारतीला भीषण आग चार जणांचा मृत्यू

मुंबईच्या अंधेरीमधील मरोळ परिसरात असणाऱ्या मैमून इमारतीला काल रात्री दोनच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

fire_mumbai

अंधेरीमधील मरोळ परिसरात असणाऱ्या मैमून इमारतीला रात्री दोनच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आगीतून सात जणांची सुटका करण्यात आली आहे.

मुंबईच्या अंधेरी विभागात असलेल्या मरोळ मध्ये मैमून इमारतीत तिसऱ्या मजल्याला भीषण आग लागली असून यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. हे चार ही जण कपासी या एकाच कुटुंबातील आहेत. रात्री २ वाजताच्या दरम्यान या इमारतीत राहणाऱ्या कपासी कुटुंबाच्या रूम नंबर ६०३ ला भीषण आग लागली.

हे कुटुंब खिडकी मधून लोकांकडे मदत मागत होते. परंतु त्यांना कोणाला ही मदत करणे शक्य झाले नाही. अग्निशमन दलाने दिलेल्या माहिती नुसार ही आग दीड ते दोन वाजताच्या दरम्यान लागली होती. आग लागली त्या घरात एकूण चार जण होते तर त्याच्या वरच्या माळ्यावर ७ जण होते. या सर्व जखमींना कूपर आणि जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. पोलीस आणि अग्निशमन दल आग कश्या मुळे लागली याचा शोध घेत आहेत.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: