पुणेमहाराष्ट्र

पुण्यातील वारजे परिसरात एटीएमला आग

वारजे गणपती माथा परिसरातील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम जळून खाक झाले आहेत

पुणे: पुण्यातील वारजे परिसरात गुरुवारी मध्यरात्री इलेक्ट्रिक दुकान आणि एटीएम सेंटरला भीषण आग लागली. यात मोठे नुकसान झाले आहे. एटीएममधील लाखो रुपये जळून खाक झाले असल्याचे सांगितले जाते. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

वारजे परिसरातील गणेश माथ्याजवळ इलेक्ट्रिक दुकान आणि त्याला लागूनच एका बँकेचे एटीएम सेंटर आहे. इलेक्ट्रीक दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. काही वेळातच आग पसरली आणि तिने एटीएम सेंटरलाही कवेत घेतले. एटीएममधील रोकडही जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग विझवली आहे. एटीएममध्ये गुरुवारीच पैशांचा भरणा केला होता. त्यामुळे लाखो रुपये जळून खाक झाले असावेत, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, गेल्या आठवड्यातच सहकारनगरमधील जनता सहकारी बँकेच्या एटीएमला आग लागली होती.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: