PoliticalNational

आप’च्या 20 आमदारांना अपात्र ठरवणं ही तुघलकशाही:यशवंत सिन्हा

‘संसदीय सचिव’ हे लाभाचे पद भूषविल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली विधानसभेतील सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या (आप) 20 आमदारांचे सदस्यत्व रद्द केले.

Yashwant sinha

नवी दिल्ली – ‘संसदीय सचिव’ हे लाभाचे पद भूषविल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली विधानसभेतील सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या (आप) 20 आमदारांचे सदस्यत्व रद्द केले. यावरुन माजी केंद्रीय अर्थमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. ट्विटरच्या माध्यमातून सिन्हा यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर निशाणा साधला आहे.

”राष्ट्रपतींकडून आपच्या 20 आमदारांचे दिल्ली विधानसभेतील सदस्यत्व रद्द करणं म्हणजे पूर्णतः न्यायाची भ्रूण हत्या करण्यासारखं आहे. कोणतीही सुनावणी झाली नाही, हायकोर्टाच्या आदेशाची प्रतिक्षादेखील करण्यात आली नाही. ही वाईट पद्धतीची तुघलकशाही आहे”, असे ट्विट करत सिन्हा यांनी राष्ट्रपतींवर हल्लाबोल चढवला आहे.

केवळ यशवंत सिन्हा यांनीच नाही तर आपल्या पक्षाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करणारे भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीदेखील दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं सांत्वन करणारे ट्विट केले आहे.  ”आप आए, आप छाए, आप ही आप चर्चा का विषय, घर घर में, हर घर में, तो फिर किस बात की फिक्र है आपको?”, असे ट्विट करत शुत्रघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा भाजपाविरोधी भूमिका जाहीरपणे मांडली आहे.

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: