National

गुजरातमध्ये मतदानाला सुरूवात ,89 जागांसाठी मतदान सुरू.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. आज 19 जिल्ह्यातील 89 जागांसाठी मतदान होत आहे. तर 89 जागांसाठी तब्बल 977 उमेदवार रिंगणात आहेत.

gujrat

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज, शनिवारी ८९ मतदारसंघांमध्ये मतदान होत असून, यात सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील मतदारसंघांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात १४ डिसेंबरला मतदान होणार आहे. मतमोजणी १८ डिसेंबरला होईल.

गुजरात विधानसभेच्या १८२ जागा असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात ८९ आणि दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार गुरुवारी सायंकाळी संपला. या फेरीत एकूण ९७७ उमेदवार रिंगणात असून, दोन कोटी १२ लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पहिल्या फेरीत मुख्यमंत्री विजय रुपानी (राजकोट पश्चिम), काँग्रेस नेते शक्तिसिंह गोहिल (मांडवी) आणि परेश धानानी (अमरेली) यांचा कस लागणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी भाजपचा प्रचार करणारे स्वामीनारायण पंथाचे धर्मगुरू भक्तिप्रसाद स्वामी यांच्यावर गुरुवारी रात्री उशिरा हल्ला करण्यात आला. जुनागड जिल्ह्यात ही घटना घडली. स्वामी यात जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजपने केला आहे. काँग्रेसने हा आरोप फेटाळला आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: