ElectionPoliticalNational

विजय रुपाणी गुजरातचे मुख्यमंत्री,

तर उपमुख्यमंत्रीपदाची माळ नितीन पटेल यांच्याच गळ्यात घालण्यात आलीय.

गुजरात विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी आणि मुख्यमंत्रिपदी विजय रुपानी यांची निवड झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रुपानी यांच्या नावाची घोषणा केली. नितीन पटेल यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. यंदाची गुजरात विधानसभेची निवडणूक विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली होती.

भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच २५ डिसेंबरला गुजरातमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने 182 पैकी 99 जागांवर विजय मिळवत बहुमत मिळवलं आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण असेल, हे जाहीर करण्यात आलं.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: