National

जम्मू-काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा ,काश्मीरच्या हंदवाडामध्ये एन्काऊंटर.

जम्मू- काश्मीर मधील हंदवारामध्ये रविवारी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं आहे.

indian-Army

जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा येथील उनीसूमध्ये रविवारी रात्री झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या चकमकीत एका नागरिकाचाही मृत्यू झाला. या महत्त्वपूर्ण ऑपरेशननंतर उनीसूमध्ये चकमक थांबली असून परिसरात तणावाची स्थिती आहे.

शनिवारी शोपियांमध्ये काही दहशतवाद्यांबरोबर सुरक्षा दलाच्या जवानांची चकमक झाली होती. त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात हे दहशतवादी यशस्वी झाले होते. त्यानंतर काल रात्री पुन्हा दहशतवाद्यांनी उनीसूमध्ये धुडगूस घातला. त्यामुळे जवानांनी त्यांना दिलेल्या प्रत्युत्तरात तीन दहशतवादी ठार झाले. जवानांनी या अतिरेक्यांकडून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला आहे. सध्या दहशतवादी आणि जवानांमधील चकमक थांबली असून जवानांनी या परिसरात मोठ्याप्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.

जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक एस.पी. वैद्य यांनी टि्वट करून या बाबतची माहिती दिली. कडाक्याची थंडी असतानाही जवानांनी रात्रभर अतिरेक्यांशी झुंज देत त्यांना ठार केले. या ऑपरेशनमध्ये लष्कराचे जवान, सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि जम्मू-काश्मीरचे पोलीस सहभागी झाले होते, असं वैद्य यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: