National

हेलीकॉप्टरच्या दोरखंड तुटल्याने तीन जवान पडले , आर्मी डेच्या सरावादरम्यान अपघात

भारतीय सेना 15 जानेवारीला 'आर्मी डे' साजरा करणार आहे. मात्र यापैकी कोणालाही गंभीर इजा झाली नसल्याचं भारतीय सैन्याकडून सांगण्यात आलं आहे.

helicopter-mishap

लष्कर दिनासाठी दिल्लीच्या आर्मी परेड ग्राऊंडवर सुरू असलेल्या सरावादरम्यान ध्रुव हेलिकॉप्टरची दोरी तुटून अपघात झाला. यात तीन जवान जखमी झाले. मंगळवारी ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हेलिकॉप्टरच्या बुममध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

१५ जानेवारीला लष्कर दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त दिल्लीच्या आर्मी परेड ग्राऊंडवर मंगळवारी सराव सुरू होता. त्यावेळी ध्रुव हेलिकॉप्टरमधून जवान दोरीच्या साह्याने उतरण्याचा सराव करत होते. मात्र, दोरी तुटली आणि जवान खाली पडले. यात तीन जण जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. तिघांची प्रकृती स्थिर आहे. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीनंतरच अपघाताचं कारण समजेल, असंही अधिकारी म्हणाले.

भारतीय सैन्याचे पहिले कमांडर इन चीफ लेफ्टनंट जनरल केएम करियप्पा यांच्या सन्मानार्थ 1949 पासून आर्मी डेची सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी सर्व कमांड हेडक्वॉर्टर आणि राजधानी दिल्लीत आर्मी परेड आणि अन्य कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्याआधी ब्रिटीश वंशाचे फ्रान्सिस बूचर हे भारताचे शेवटचे लष्करप्रमुख होते.

या निमित्ताने आयोजित परेड आणि शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनाचा उद्देश जगाला आपली ताकद दाखवून देण्यासाठी आणि देशातील तरुणांना सैन्यात सामीत करण्यासाठी प्रेरित करण्याचा असतो.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: