Technology

व्हिडीओकॉनचे हजारो कर्मचारी सक्तीची सुटी जाहीर

व्हिडिओकॉनच्या चितेगाव प्रकल्पातील शेकडो कर्मचाऱ्यांना ८ जानेवारीपासून १२ दिवसांची सक्तीची सुटी जाहीर करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

vediocon

व्हिडिओकॉनच्या चितेगाव प्रकल्पातील शेकडो कर्मचाऱ्यांना ८ जानेवारीपासून १२ दिवसांची सक्तीची सुटी जाहीर करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सुट्या नेमक्या कशासाठी दिल्या याची अधिकृत माहिती कंपनी व्यवस्थापनाने दिली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीती, शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, व्हिडिओकॉन उद्योग समूहाचे प्रमुख, खासदार राजकुमार धूत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला विषयावर काहीही बोलायचे नाही, असे म्हटले.

रजा नेमकी कशासाठी दिली याची अधिकृत माहिती कंपनी व्यवस्थापनाने न दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि शंकेचं वातावरण निर्माण झालं आहे.

औरंगाबादमध्ये व्हिडीओकॉनचं  मोठं युनिट आहे. यात फ्रीज, वॉशिंग मशिन, मोबाईल, एसी आणि इतर घरगुती उपकरणांची निर्मिती केली जाते.

येथे ६ हजार ४५९ कर्मचारी कार्यरत आहेत. दोन आठवड्यांपूर्वीच नवीन वर्ष आगमनाचे कारण सांगून २८ डिसेंबर ते ५ जानेवारी २०१८ पर्यंत सुट्या देण्यात आल्या होत्या. ७ जानेवारी रोजी प्रत्येक युनिटमध्ये नोटीस लावून ८ ते १८ जानेवारी सुटी जाहीर करण्यात आली.

एवढी प्रदीर्घ सुटी सर्वांना देण्यामागचे नेमके कारण काय, याचा कोणताही उल्लेख नोटिसीत नाही. या सुट्यांचा पगार मिळणार का, अशी विचारणा काही कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकांकडे केली तेव्हा काहीही उत्तर मिळाले नाही.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: