National

रेस्टॉरन्टला भीषण आग ५ जणांचा होरपळून मृत्यू

रेस्टॉरन्टला आग लागली रात्री अडीचच्या सुमारास ही आग लागली

fire-bangalore

बंगळुरुत एका रेस्टॉरन्टला लागलेल्या आगीमध्ये पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  बंगळुरूत एका  रेस्टॉरन्टला अचानक भीषण आग लागली. यामध्ये आत झोपलेल्या पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. बंगळुरुतील भाजी मंडतील कुंभारा सांघा बिल्डिंगमधील तळघरामध्ये असेलेल्या कैलास बार आणि रेस्टॉरन्टला आग लागली होती. आज पहाटे 2: 30 वाजता ही दुर्देवी ही घटना घडली.

होरपळून मृत्यू झालेले हे सर्व कर्मचारी हॉटेल बंद झाल्यानंतर तिथेच झोपले होते. पण अचानक आग लागल्याने त्यांना बचावाची कुठलीच संधी मिळाली नाही. यात या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. आगीची माहिती समजताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तोपर्यंत आग पसरली होती. बेंगळुरुतील कुंभारा संघ इमारतीत कैलास बार आणि रेस्टॉरन्ट आहे. नेहमीप्रमाणे रात्री उशिरा बार बंद केल्यानंतर कर्मचारी तिथेच झोपी गेले होते. रात्री अडीचच्या सुमारास अचानक आग लागली.

ज्यावेळी रेस्टॉरन्टला आग लागली त्यावेळी काही कर्मचारी आतमध्ये झोपले होते. आग लागल्यानंतर ते रेस्टॉरन्टमध्ये अडकले गेले. आगीच्या धुरामध्ये घुसमटून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्यामध्ये स्वामी (23), प्रसाद (20), मंजूनाथ (45), किर्ती (24) आणि महेश (35) यांचा समावेश आहे.

या घटनेबद्दल माहिती मिळाल्यानंतर तातकाळ घटनास्थळावर अग्निशामक दलाच्या गाड्या आणि बंब दाखल झाले. पहाटे पाच वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. तोपर्यंत आत झोपलेल्या पाच जणांचा या अग्नितांडवामध्ये मृत्यू झाला. ही आग नेमकी कशामुळं लागली हे अद्याप समजू शकले नाही.

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: